When Netherlands Marathi Mandal said they were keen to publish a Marathi Story in their 2016 Diwali Special, it was an honor. Having never written a Marathi story before, it did pose a challenge to reinvent me. Marathi was one of the first languages I read into, it is the language that I think in.Writing in a Diwali special is a big honor itself, as Diwali Special or Diwali Ank as we call them are an integral part of Marathi culture. This is a surrealistic experience of our favotire Runner who as always is keen to run.
Presenting before you, my first story in Marathi-
मृत्यापेक्षा जलद.
एक गंमत अशी आहे कि, आयुष्य किती मूल्यवान आहे ह्याचा प्रत्यय सर्वांना ते संपायच्या काही क्षणा आधीच येतो. पण आपण किती संकटात आहे ह्याचा प्रत्यय आला कि आता किती आयुष्य राहिले ह्याचा आभास होतो - असे फालतू विचार नेमेके धावतानाच का येतात, हा प्रश्न त्याला पडला. मुळात एका डोंगराच्या उतारावरून स्वतःचा जीव वाचवत, भयंकर आणि क्रूर विशांच्या नावाच्या एक आदिवासी समाजाच्या काही भयंकर योध्यापासून जीव वाचताना मनात कोणतेही विचार का म्हणून यावे, हेच त्याला कळत नव्हते. "असे भयंकर योध्ये ज्यांनी सकाळी एक जिवंत गेंडा मारला, तोही फक्त लाकडी भाल्यान्ने," त्याने स्वतःला आठवण करून दिली,"पण दुपारी तोः गेंडा किती छान शिजवला होता, आदिवासी वहिनीने, जो उगाचच चोरून खायायला नको होता," अजून एक विचार त्याच्या मनात चुकचुकला.
त्याच्या जल्म मुळात धावण्यासाठी झाला होता. जे लोकं नायीलाजाने त्याला ओळखतात, ते त्याला 'मेघदूत' म्हणतात. त्याच्या खरं नाव काय हे कोणालाच माहित नाही वा तोः कधी कोणाला सांगत नाही. तो लोकांचे संदेश पोहचवतो, म्हणून असो, किवां मेघा सारखा अलगत पणे वाहत असतो म्हणून असेल. त्याला ओळखायची किंमत फारच जास्त आहे, आणि त्यांने तुम्हाला ओळखायची किंमत आणखीन जास्त. ज्या लोकांना काही हरवलेल्या गोष्टी शोधायच्या आहेत ते लोकं त्याला शोधतात. प्रभुणे सारख्या पुण्यवान आणि सनातनी कुटुंबात हे असा एक बेणं कसं काय जल्माला आल हेच काही कोणाला कळत नाही.
ही कथेची सुरुवात नाही, किवां अंत हि नाही. गोष्टीच्या मध्ये येयून, गोष्ट कळत नाही, त्यासाठी मागे जावं लागतं. अगदी सुरुवातीला.
चार दिवसांपूर्वी मेघदूत अण्णांच्या टपरीवर चहा पीत बसला होता. अण्णा म्हणजे अण्णा पावशे. मुंबई मध्ये दादर स्टेशन जवळ 'मगधीरा' असा मद्रासी नावाच्या हॉटेलचे चक्क मराठी स्तापक. एक प्लेट मिसळ पाव, दोन कप चहा आणि रेडीओवर रफी साहेबांचे गीत- 'मै जिंदगी का साथ निभाता चला गया'- असा थाट मांडला होता.
मेघदूताकडे सध्यातरी काही काम नसल्याने तो नीवांत बसला होता. तेह्वा अचानक एक लहान मुलगा त्याच्या समोर येयून बसला. मेघदूताने आजू बाजूला पाहिले,
"कोणाला सोधतोस?" मुलाने विचारलं.
"तुझे आई वडील कुठे आहेत?"मेघादूताने विचारलं.
"मी काय तुला लहान मुलगा दिसतो?" मुलाने अपले उजव्या हाताचे बोट हनुवटीवर लावले.
"अरे, कोण करताय रे मस्करी?" मेघादूताने आजू बाजूला विचारलं.
"काय झालं?" अण्णा पावशेंनी जवळ येयून विचारलं,"काय हवाय का?"
"अरे, हा मुलगा कोणाचा?" मेघादूताने अण्णांना विचारलं.
अण्णाने एकदा मेघदूताकडे पहिले, मग मोकळ्या बाकड्याकडे पहिले. पुनः मेघादूताकडे, आणि मुकाट्याने आपल्या कामाला निघून गेला.
अण्णाला जाताना पाहून मेघदूत हबकला. अरे.
"तो मला पाहू शकत नाही," त्या मुलाने सांगितले.
"तू कोण आहेस?" मेघदूताने विचारले.
"तुला मी कोण दिसतो?" त्या मुलाने दुधाचा पेला उचलला. हे दूध कुठून आल?
"तू एक सात वर्षांचा मुलगा आहेस," मेघादूताने सांगितला.
"आश्चर्य आहे. जाऊदे तो तुझा आणि तुझ्या मानोपचारतज्ञाचा प्रश्न आहे. माझा न्हवे. माझे तुज्या कडे वेगळं काम आहे."
"अरे पण तू आहेस कोण?" मेघदूत ने विचारले.
"हा ते..." असे त्या मुलाने म्हणाल्याबरोबार अण्णाचे हॉटेल, ते टेबल, तो वेटर, सगळे काही गायब झालं. एका क्षणात मेघदूत उभा होता एका मोठ्या दगडावर आणि चहुकडे होता समुद्र. मेघादूताने समोर पहिले आणि हबकला. समोर चक्क यमदेव उभे. अवाढव्य ते शरीर, सात फूट उंची, दाट पिळदार मिश्या आणि खांद्यावर सोनेरी गदा. "अजून काही प्रश्न आहेत, मी कोण ह्या बाबतीत?"
"तू...तू...तुम्ही...तू...तुम्ही..." मेघदूत काही क्षणातच अखंड बाराखडी विसरला.
"हा तर," तो मुलगा समोर पुनः बसलेला, तोच बाकडा, तोच टेबल आणि तो मेघदूत. एक वेटर टेबल पुसायला आला.
"एक चोकलेट दूध आण," मुलाने ओर्डर दिली, "हा तर मेघदूत. मी असा ऐकलय कि तू वस्तु आणण्यात पटाईत आहेस. माझा काम आहे तुझ्या कडे."
"काम...माझ्याकडे....आहो पण..." मेघदूत पुटपुटतला.
"हो माहित आहे, माहित आहे. मी एक देव आहे. सर्वात शक्तिमान आणि मृत्यूचा अधिकारी आहे. पण कलियुगात किती कामगिरी वाईट आहे. कधी कधी, देवाला पण मानवाचे दर्शन घ्यावे लागते."
"काम काय आहे?" मेघादूताने विचारलं.
"तुझ्या आवडीचे... धावणे," मुलगा स्मितहास्यात बोलला.
धावणे. धावणे. आवडीचे काम. यमदूताने एवढच सांगितलं. अरे एवढा धावायचं वेड होते तर ऑलिम्पिक मध्ये जायचं, कशाला फालतू काम घेतलेस? मुळात यमदेव जेव्हा तुमच्या समोर बसलेले असतात, तेह्वा नाही कसाकाय म्हणायचं? यमादेवाने धावणे सांगितले खरे, पण हे नाही सांगितले कि धावताना मागे 'विशांच्या' नावाचे धोकादायक जमात लागेल. विशांच्या समाज हे 'विशासुर' नावाच्या एका असुराचे वंशज. कथे प्रमाणे, विशांचा असुराने आपल्या दिव्या विदयेच्या मदतीने यमदेवाला साप-शिडी मध्ये हरवला.
"एक मिनिट. साप-शिडी?" मेघदूताने प्रश्न केला.
"अरे हो, माझा आवडता खेळ. कितीही शिड्या चढा, कितीही सापांपासून वाचा, शेवटी तुम्हाला मीच सापडणार. मृत्यू." तो मुलगा हसला.
"आणि त्यांने तुला...तुम्हाला... हरवल...," मेघदूत ने पूर्ण केलं.
"बरोबर. साप-शिडी मध्ये," त्या मुलाने गोष्ट पुढे सांगितली.
तर मृत्यूचा झाला पराभव आणि यमदेवाने विशासुराला विचारले, "सांग, तुला काय वरदान हवे."
विशासुर अती हुषार आणि ज्ञानि होता. तो म्हणाला, "हे धर्मराजा, मला मृत्युमणी हवाय."
मृत्युमणी हा एक फार जुना मणी,जो म्हणे स्वतः यमादेवाने आणि चित्रगुप्ताने बनवला. ज्याच्याकडे मृत्युमणी, त्याच्याकडे मृत्यूपासून वाचण्याचा मार्ग मोकळा होतो. मृत्युमणीच्या मदतीने विशासुर अनेक वर्ष मृत्युपासून वाचला. आणि स्वतःच्या सहायकांना दीर्घायुष्य वाटू लागला. यमदेवाने फार वाट पहिली. आज मणी हरवेल, उद्या हरवेल. पण विशासुर फार हुषार होता. त्याने मृत्युमणी एका गुप्त गुहेत लपवून ठेवला.
"मृत्युमणी उचलायचा, आणि जोरात धावायच..." यमदेव म्हणाला, "सोप्प आहे.."
'सोप्प आहे. फक्त धावायच,' मेघदूताने विचार केला, 'हे काय सोप्प आहे?' फक्त एक उंच कडा आणि हे सगळं संपून जाईल. मेघदूताचे पाय दुखत होते, पण सकाळी ज्या योध्याने लाकडी भाल्याने तो गेंडा मारला होता, तोचं योध्या जवळ येत होता- भाला घेऊन. धाव, मेघदूत, धाव. मेघावुन जोरात धाव. जर त्या योध्याने पकडलं तर? काय ह्याच्या मासाची आमटी करणार उद्या?
आणि तेवड्यात मेघादूताने मागे पहिले, तो योध्या हळू झाला होता. धावताना त्याच्या पायात एक काटा लागला आणि तो योद्धा हळूहळू मागे राहुन गेला. अरे वा, मेघदूताने विचार केला,'सुटलो!!!'
मनात एक पाल चुकचुकली, काय यमदेव, त्याला मदत करतोय? यमदेव खरच त्याच्या...
मेघदूताच्या पायाखालची जमीन सरकली. एका क्षणातच मेघदूताच्या डोळ्या समोर त्याचे आयुष्य उभे राहिले. सहा सेकंदात, त्याच्या मेंदूमध्ये एक कळ आली. आज पंडित प्रभुणे च्या कुटुंबाचा दिवा विझला. नाही नाही. विझला नाही, सत्तर फूट उंच कडेवरून घसरला.
गडगडत, धडपडत आणि हवेत गटांगळ्या खात, मेघादूनाच्या हृदयाने शेवटचा ठोका दिला. धक. आणि त्याचे डोळे विझले, कायमचे.
नऊ. आट. सात. सहा. पांच. चार.
"आयुष्य संपल्यावर माणूस आकडे उलटे का मोजतो?" ह्या निरागस प्रश्नाने मेघदूताच्या मनात घर केला. "डोळे जर आत्ता उघडले, तर मी नरकात असेल का स्वर्गात का चक्क वैकुंठात?"
अलगत पणे, मेघादूताने डोळे उघडले. प्रखर उनाचा चटका त्याला लागला. हेच ना स्वर्ग, ना नर्क, हे वैकुंठ सुद्धा नाही. तो तिकडेच होता, डोंगराच्या पायथ्याशी, पाठीवर आडवा. त्याने शरीरावर हात फिरवला. कुठेच खरचटला सुद्धा नाही. एक हात डोक्यामागे नेला, सत्तर फुट उंचीवरून पडून सुद्धा एकही इजा नाही?
"झोप झाली?" एक ओळखीचा आवाज कानात पडला, आणि मेघदूताने वर पहिले. त्याच्या डोक्याशी तोच मुलगा, एक उन्हाळी टोपी आणि हातात कॅन्डीबार धरून उभा होता. त्याने मेघदूताला दुसरा हात दिला
"खुश झालास तू? मी आता मेलो म्हणून?" मेघदुताने विचारलं.
"तू तर अजून जिवंत आहे," मुलाने कॅन्डीबार चोखत उत्तर दिलं.
"मी... जिवंत? मी... कसा...जिवंत?" मेघादूताने वर पहिले, तो सत्तर फूट डोंगर फार भयाण दिसत होता.
"तुज्याकडे मृत्युमणी आहे ना? तो त्याचा गुण. ज्याच्याकडे मृत्युमनी त्याला सत्तर फूट उंच कडेवरून पडूनही काहीच होत नाही,आणि ज्याच्याकडे मृत्युमनी नाही त्याला साध्या बाबळीच्या काट्याने सुद्धा मरण येते," पुनः तेच स्मितहास्य. ,"पंडित प्रभुणे बरोबार म्हणाले होते, तूच हे काम चोखपणे करू शकतोस."
"तर तुला माझ्या मागे बाबांनी पाठवलं तर," मेघदूत म्हणाला, "काय म्हणतात माझे बाबा?"
"कि तू खूप जोरात पळतोस," यमदेव म्हणाले,"पण धावायची एवढी हौस होती, तर धावण्याच्या शर्यतीत का नाही भाग घेतला काय माहित असे म्हणाले," त्या मुलाने एक चौकोनी डबी काढली,"चला, हा मृत्युमणी पुनः न्यायला हवा. पृथ्वीवर ह्याचे काम संपले.."
"आणि तू माझ्या मागे येणार नाहीस, जर मी जा मणी डबीत टाकला?" मेघदूताने प्रश्न केला.
"मला तुज्या मागे धावता नाही येत, मेघदूत. पण वेळ आलीना, कि मी तुझ्या पुढे उभा असेन," मणी डबीत गेला आणि अदृश्य झाला.
"पुढे? कधी पुढे? साठ, सत्तर वर्षानंतर पुढे न? अरे..."
मेघदूत डोंगराच्या दरीत, एकटाच उभा होता.
- सिद्धेश गोविंद कबे
Comments
Post a Comment
What do you think about the post? Have your say, like, dislike or even hate me. Tell me.
You might also want to Subscribe to RSS feeds or follow me on Twitter (@sidoscope) or on facebook
I don't need weapon, I have a sharp tongue.